समुदाय धोरण

images/img_not_available.jpg

जाहीरात- दाेन कन्सल्टींग अार्कीटेक्ट न‍ियुक्ती


२०१८ - १० - १८


http://gadchirolipolice.gov.in/images/cpolicing/6.jpg

पोलीस व जनता यांनी श्रमदानातून केलेली विविध कामेसदर कामांमुळे पोलीस व नागरीक अधिक जवळ येत असून पोलीस प्रशासनाप्रति त्यांच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण झालेली आहे. नागरीकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत असून नक्षल विरोधी जनमत तयार होणेस चांगलीच मदत मिळत आहे.

http://gadchirolipolice.gov.in/images/cpolicing/5.jpg

पोस्टे /उपपोस्टे/ पोमकेंच्या ठिकाणी ग्रंथालयजिल्ह्यातील दुर्गम भागात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी तसेच युवावर्ग व पोलीसांमध्ये ऋणानुबंध अधिक दृढ करुन जनसामान्यामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचे उद्देशाने पोस्टे तेथे ग्रंथालय योजना राबविण्यात आली. या अंतर्गत बाहेर घटकातून प्राप्त झालेले विविध प्रकारची 5000 पुस्तकें जिल्ह्यातील संवेदनशील 33 उपपोस्टे व पोमकेंच्या ठिकाणी पाठवून मिनी ग्रंथालय सुरु करण्यात आले आहेत.

http://gadchirolipolice.gov.in/images/cpolicing/4.jpg

ग्रामभेट योजनानागरीकांशी प्रत्यक्ष संबंध प्रस्तापित करुन जनमत तयार करण्याचे उद्देशांना गावांना भेटी देऊन ग्रामस्थांची चर्चा करणे व त्यांच्या मुलभूत समस्या जाणून घेऊन निराकरणासाठी वरिष्ठ स्तरावर संबंधित शासकीय विभागांना पाठपुरावा करणे. यामध्ये आरोग्य, पाणी, वीज, रस्ते, पुल, समाज मंदीर, गोटूल, अंगणवाडी, वन जमीन, तलाव, स्मशानभुमी शेड, बस सेवा, दुरध्वनी सेवा, ग्रामपंचायत कार्यालय, वाचनालय, शिक्षणासंबंधी, व शासकीय सेवेबाबत समस्या इत्यादी समस्यांचा प्रामुख्याने समावेश असतो.

http://gadchirolipolice.gov.in/images/cpolicing/3.jpg

पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणउद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व त्यांची लष्करी व निमलष्करी दलात निवड व्हावी, या उद्देशाने आदिवासी विकास विभागाच्या न्युक्लिअर्स बजेट योजनेच्या माध्यमातून कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत पोलीस प्रशासनामार्फत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यकम यशस्वीरीत्या राबविण्यात आलेला आहे.

http://gadchirolipolice.gov.in/images/cpolicing/2.jpg

जनजागरण मेळावेसदर मेळाव्यामध्ये राजस्व विभाग, वन विभाग, आरोग्य, बांधकाम, कृषी इत्यादी प्रशासकीय विभाग तसेच अन्य विभाग सहभागी राहून नागरिकांना सबंधीत विभागाकडील शासकीय योजनांबाबत माहितीचे मार्गदर्शन करीत आहेत. मेळाव्यात सबंधीत विभागाकडुन वेगवेगळे प्रमाणपत्र, जमिनीचे 7/12 वाटप, आर्थिक मदतीचे वाटप, क्रिडा स्पर्धा घेवून त्यातील बक्षीस वितरण, सामुहिक विवाह, आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातात.

http://gadchirolipolice.gov.in/images/cpolicing/1.jpg

आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनासहलीच्या माध्यमातून सदर विद्यार्थ्यांमध्ये नविन प्रेरणा निर्माण करण्यास चांगलीच मदत मिळत असून प्रत्येक सहलीच्या समारोप व सुसंवादाचे वेळी त्यांनी भविष्यात आपल्या पालकांना आत्मसमर्पण करणेस व नक्षल चळवळीचे नायनाट करण्यासाठी प्रयत्न करण्याचा आशावाद सुद्धा व्यक्त करीत आहेत. तसेच इतर विद्यार्थी उच्च शिक्षण घेवून जिल्ह्याचे प्रगतीमध्ये हातभार लावण्याचा निर्धार व्यक्त करत असून शासनाप्रती विद्यार्थ्यांचा तसेच सर्वसामान्य नागरीकांचा विश्वास वृंधीगत होण्यास चांगलीच मदत मिळत आहे.