श्वान पथक

Dog_Squad

श्वान पथक गडचिरोली


गडचिरोली पोलीस दलात श्वान पथकाची स्थापना 1988 ला करण्यात आली असुन गडचिरोली मुख्यालय व उपमुख्यालय प्रानहिता येथे दोन पथक आहेत. गडचिरोली जिल्हयामध्ये पोलीस पथकाचे जास्तीत जास्त नुकसान होण्याकरीता विवीध ठीकाणी भुसुरुंग लावुन ठेवतात अशा वेळी भुसुरुंग शोधुन काढण्यासाठी श्वान पथकाची भुमीका महत्वाची ठरते. तसेच जिल्हात होणाऱ्या रोड ओपनिंग व्हि.व्हि.आय.पी. दौरे मर्मस्थळे अतिसंवेदनशिल ठीकाण इत्यादीची घातपात तपासणी श्वानांकडुन करण्यात येते. गडचिरोली जिल्हयात घडणाऱ्या गंभीर गुन्हे तसेच नक्षल गुन्हे इत्यादी मध्ये आरोपी व मालमत्ता शोधणेकामी गुन्हे श्वान यांची भुमिका अत्यंत महत्वाची ठरते.


श्वान पथक गडचिरील येथील श्वान नामे लकी हि संन 2011 मध्ये महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळावा नाशिक येथील बॉब शोधक स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे व सन 2012 मध्ये भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात बॉब शोधक स्पर्धेत संपुर्ण भारत देशातुन रजत पदक प्राप्त करुन गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकीक केले आहे.