
गडचिरोली जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार युवक/युवतींना उच्च दर्जाचे व्यावसायीक प्रशिक्षण उपलब्ध व्हावे या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दि. 3 मार्च 2023 रोजी 'प्रोजेक्ट उडान' हा उपक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत रोजगार कौशल्य संस्था, गडचिरोली ही पोलीस अधीक्षक कार्यालयाचे नावे रजिस्टर्ड करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातुन बेरोजगार युवक/युवतींना व्यावसायीक प्रशिक्षणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. • गडचिरोली जिल्हयातील बेरोजगार युवक युवतींना नर्सिंग, इलेक्ट्रीशियन, जिडीए, हॉस्पीटलीटी, सुरक्षा रक्षक इ. कौशल्य प्रशिक्षण तसेच फास्ट फुड, ब्युटोपॉर्लर, शिवणकाम, दु-व्हिलर मेकॅनिक, लोणचे पापड, कुक्कुटपालन, शेळीपालन बदक पालन यासारख्या स्वयंरोजगार प्रशिक्षणाची संधी दिल्या जात आहे. • व्हॉलीबॉल, कबड्डी, मॅरेथॉन, तिरंदाजी आणि ऍथलेटिक्स यासारख्या क्रिडा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रोजेक्ट उडान च्या माध्यमातुन विशेष प्रयत्न केले जात आहेत. • रोजगार कौशल्य संस्था पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोलीच्या माध्यमातून युवक युवतींना सॉप्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, वाहन चालक प्रशिक्षण, सुरक्षा रक्षक प्रशिक्षण दिले जातात. आज पर्यंत " प्रोजेक्ट उडान प्रशिक्षण देण्यात आले आहे. च्या माध्यमातून १३१०५ बेरोजगार युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे