
गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोस्टे, उपपोस्टे व पोमके येथे " एक गाव एक वाचनालय" ची स्थापना करण्यात आली. गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम भागात असलेले युवक युवतींना शासनाच्या प्रवाहात आणुन त्यांचा सर्वांगीन विकास करण्याच्या दृष्टीने तसेच बौध्दीक कला गुणांना वाव मिळावा व वैचारिक क्षमतेत वाढ होवुन ते माओवाद विचारधाराकडे आकर्षित होवु नयेत. त्यांना जगात घडत असलेल्या विविध स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, घडामोडीची माहिती वाचनातुन मिळावी व वाचनालयाच्या माध्यमातुन स्पर्धा परीक्षेकडे कल वाढावा या करीता एक गाव एक वाचनालयाची स्थापना करण्यात आली आहे आजपावेतो या उपक्रमाअंतर्गत गडचिरोली जिल्हयात एकुण 68 वाचनालयाची निर्मीती करण्यात आली आहे