
राष्ट्रीय पोलीस मिशन अंतर्गत गृह मंत्रालय, भारत सरकारद्वारा राबविण्यात येणारा 'Student Police Cadet Programme' हा राष्ट्रीय स्तरावरावरील उपक्रम गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात प्रथमतः च गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 मध्ये Residential Student Police Cadet Programme पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे घेण्यात आला. यामध्ये गडचिरोली जिल्हयातील 10 शाळेतील एकुण 300 कॅडेट्सचे सहभाग नोंदवीला. सदयस्थितीत सदर 10 शाळेतील एकुण 1052 विद्यार्थ्यांना त्यांच्या हद्दीतील पोलीस मदत केंद्रामार्फत दरमहा दोन बाह्यवर्ग व एक आंतरवर्गाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.