
गडचिरोली जिल्ह्यात फोफावलेल्या माओवादामुळे व थांबलेल्या विकासाच्या दृष्टचक्रामध्ये विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र-छत्तीसगड या दोन्ही राज्यातील सिमावती भागातून माओवाद्यांचा गडचिरोली जिल्हयात प्रवेश बंद करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नेलगंडा या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली. ग्रामस्थांच्या हस्ते या पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस स्टेशन नेलगुंडा हे छत्तीसगड राज्य सिमेपासून फक्त 600 मीटर अंतरावर असलेल्या अति-दुर्गम नेलगुंडा व आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता हे पोलीस स्टेशन मैलाचा दगड ठरेल.