
माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, त्यांचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दिनांक 09 मार्च 2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत कवंडे या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली. तसेच कर्वडे गावातील नागरिकांनी नक्षलवाद्यांना गावबंदी करून विकासाचा मार्ग स्विकारला आहे. पोलीस स्टेशनची उभारणी करतांना 02 दिवसांमध्ये पोस्टे नेलगुंडा ते पोस्टे कवंडे पर्यंत 06 कि.मी.चा कच्चा रस्ता तयार करण्यात आला. तसेच मागील 02 वर्षात एकुण 07 नवीन पोस्टे/पोमके स्थापन करण्यात आले.