
माओवाद्यांच्या बालेकिल्ला असलेल्या लाहेरी परिसरात गडचिरोली पोलीस प्रशासनाच्या वतीने भामरागड उपविभागातील अतिदुर्गम पेनगुंडा येथे दिनांक 11/12/2024 रोजी नवीन पोलीस मदत केंद्र. स्थापण करण्यात आलेले आहे. तसेच दि 05 डिसेंबर 2024 रोजी पेनगुंडा गावातील नागरीकांनी सर्वानुमते एकत्र येवुन नक्षल गावबंदी करुन त्या बाबतचा ठराव पारित केला आहे. पेनगुंडा पोलीस मदत केंद्र आजुबाजुच्या गावांच्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रवेशद्वार म्हणुन काम करेल. पोमकें पेनगुंडा हे अबुजमाड सारख्या माओबाद दृष्ट्या संवेदनशील भागापासून अतिशय जवळ असल्याने या भागातील माओवाद्यांच्या हालचालीवर करडी नजर ठेवून त्यांच्या कारवायांवर आळा घालण्यात नक्कीच यश मिळेल.