
प्रोपागंडा (माओवाद विरोधी प्रचार शाखेमार्फत) चालणारी कामे
माओवाद्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये आपले हिसक विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विविध बैठका, नाट्यमंच, गाणे इ. चा वापर केला आणि सर्वसामान्य जनतेला माओवादाच्या हिंसक वाटेवर आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यालाच प्रतिउत्तर म्हणून गडचिरोली पोलीस दलाकडून सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच माओवाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता त्यांचा खरा चेहरा उघड करण्यासाठी सुरुवातीच्या काळात कलापथके, ग्रामभेट, कापडी बॅनर व पोस्टर्स यांचा वापर करण्यात आला. मात्र सोशल मिडीयाच्या वाढत्या वापरानुसार माओवाद विरोधी प्रचार शाखा पुढील प्रमाणे काम करत आहे.
१) जनजागृतीसाठी नाविण्यपूर्ण कल्पनेतून पोस्टर्स, व्हिडीओ, शॉर्ट फिल्म तयार करुन त्याचा सोशल मिडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करणे.
२) गडचिरोली फाईल्स (डिजीटल अॅनिमेश पोस्टर) तयार करुन त्याचा सोशल मिडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करणे.
३) गडचिरोली पोलीस दलाचे सामाजिक माध्यमांवरील ऑफिशिअल अकाऊंट (इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर इ.) हाताळणे.
४) गडचिरोली पोलीस दलाच्या शीर्य दाखविणारे टेबल कॅलेंडर व गोंडी कॅलेंडर तयार करणे.
५) विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी कोनशिल तयार करणे.
६) शहिद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या शौर्यस्थळाची देखभाल तसेच विविध चकमकीची टाईमलाईन तयार करुन शौर्यस्थळ येथे लावणे.
७) गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांचे बॅनर्स तयार करणे.
८) कापडी बॅनर्स तयार करून अतिदुर्गम भागात जनजागृती करणे.
९) कलापथकाच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील गावात आठवडी बाजारादरम्यान माओवाद विरोधी जनजागृती करणे.
जनसंपर्क कार्यालयामार्फत चालणारी
कामे
१) गडचिरोली पोलीस दलाचे प्रतिनिधी म्हणून माध्यमांशी आणि अन्य लोकांशी संवाद साधणे, माहिती देणे,
२) पत्रकार परिषदांचे आयोजन करणे.
३) गडचिरोली पोलीस दलाच्या कार्याविषयी वार्तापत्र तयार करुन (प्रिंट मिडीया/डिजीटल मिडीया) प्रसार माध्यमांना पोहचवणे.
४) गडचिरोली पोलीस दलाच्या वतीन आयोजित विविध कार्यक्रमांचे नियोजन करुन सुत्रसंचालन करणे.
५) शहिद अंमलदारांच्या कुटुंबियांना येणाऱ्या अडचणी सोडवून त्यांना सहकार्य करणे.
६) दिवाळी, जागतिक आदिवासी दिन व गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त जाहिरात तसेच कार्यालयीन ई-निविदा प्रसिद्धी करणे.
फोन नंबर : 8007670759
ई-मेल आयडी : prapogandacell245@gmail.com