लोकप्रिय माहिती
गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग भामरागड येथे प्रायोगित तत्वावर सदर योजना सुरु करण्यात आली. सदर खिडकीच्या माध्यमातुन आदिवासी जनतेला विविध शासकीय योजना, शासकीय दाखले, उच्च दर्जाचे कृषी बियाणे, रोजगार, स्वयंरोजगार अशा अनेक योजना एकाच खिडकीच्या माध्यमातुन राबविण्यात आले आणि त्यामध्ये जनतेचा उत्स्फुर्त सहभाग दिसुन आला त्यानंतर सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें च्या ठिकाणी दादालोरा खिडकी तयार करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात एकुण 53 दादालोरा खिडकी तयार करण्यात आली आहे आणि अशा प्रत्येक पोलीस दादालोरा खिडकी मध्ये एक civic action team कार्य करते.
प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी गडचिरोली पोलीस कटिबध्द आहेत. भीती किंवा प्रलोभनाला बळी न पडता या देशाच्या कायदयांची कसोशीने अंमलबजावणी करण्याचा आमचा संकल्प आहे.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या महाराष्ट्र पोलीसांच्या ब्रीदवाक्याला स्मरून आम्ही समाजातील सद्प्रवृत्तींचे रक्षण तसेच अपप्रवृत्तींवर अंकुश ठेवण्याचा सतत प्रयत्न करू. कायदे व नियमांचे पालन करून आपण आमच्या ह्या प्रयत्नांना साथ दयावी ही विनंती.आपल्या एकत्रित प्रयत्नांमधून गडचिरोली सुरक्षित आणि समृध्द बनेल याची मला खात्री वाटते.
श्री. नीलोत्पल, भा.पो.से.,
पोलीस अधीक्षक, गडचिरोली.