Special Units | Gadchiroli Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

कमांडो-६०


Officers Portfolio

About Us

सि-60 ची पार्श्वभुमी:


गडचिरोली जिल्हयाचे विभाजन झाल्यापासून नक्षल कारवायांमध्ये वाढ झाली. म्हुणून नक्षल कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठीच 01/12/1990 साली श्री. के.पी. रघुवंशी (पोलीस अधीक्षक, गडचिरोली) यांनी सी-60 ची स्थापना केली. तेव्हा सि-60 मध्ये फक्त 60 सक्षम व विशेष कमांडो ची नेमणूक करण्यात आली व पोलीस निरीक्षक एस.व्ही. गुजर हे सी-60 चे पहिले प्रभारी अधिकारी होते.


गडचिरोली जिल्हयात नक्षल कारवायांवर वाढ झाल्याने परत त्यांचेवर प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोली ला दोन विभागात विभाजन केले (उत्तर विभाग व दक्षिण विभाग) दक्षिण भागात नक्षल कारवायांवर वाढ झाल्याने प्राणहिता उप मुख्यालय येथे मार्च 1994 साली सी-60 चे दुसऱ्या मुख्यालयाची स्थापना झाली.


सी-60 चा प्रत्येक जवान हा आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला आळा घालण्यासाठी अथक परिश्रम करीत आहे. सी-60 पथक हे नक्षल्यांचा कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाते. सि-60 पथकाला यापूर्वी (क्रॅक कमांडो) या नावाने सुध्दा ओळखले जात होते.


सि-60 पथकाची धडक कारवाई:


प्रशिक्षित सी-60 येथील जवान कठोर परिश्रम घेवून गडचिरोली जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात जावून पहाडी व अतिदुर्गम भागामध्ये नक्षल विरोधी अभियान राबवितात. दरम्यान नक्षल चळवळी मध्ये असणाऱ्यांच्या परिवाराला व नातेवाईकांना भेटून त्यांना आतमसमर्पण बाबत विविध शासकिय सुविधा व योजनांचे मार्गदर्शन करुन त्यांचा लाभ घेवण्यास त्यांचे मन परिवर्तन करुन त्यांना लोकशाही च्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास प्रवृत्त करतात. मात्र कट्टर नक्षल वरील शासकिय योजनेला व लोकशाहीला विरोध करुन लोकांना शासना विरुध्द भडकवतात अशा जहाल व कट्टर नक्षल्यांचा शोध घेवून खात्मा केला जातो. तसेच त्यांचे व नक्षल चळवळीस आळा घालण्यास बहुमोल सहकार्य केले तसेच अतिदुर्गम भागामध्ये जावून जनसंपर्क साधुन शासनांचे विविध धोरण लोकांसमोर मांडुन त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम या जवान योग्यरित्या पार पाडत आहे.


जनतेशी सुसंवाद व त्यांच्या समस्या:


नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे अति दुर्गम व जंगल भागात कोणीही शासकिय अधिकारी/ कर्मचारी जात नाही, अशा गावात सि-60 पथके जावून तेथिल लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतात (जसे - विज, रस्ते, तलाव, बोअरवेल, आरोग्य, शाळा, बससेवा) व मुख्यालय येथे आल्यावर वरीष्ठ अधिकारी यांना सांगुन संबंधीत कार्यालयाकडून सदर ची कामे पुर्ण होईल त्या अनुषंगाने इतर शासकिय विभागातील कार्यालयातील अधिकारी यांच्याशी चर्चा करुन सोडविण्याचा प्रयत्न करता .


खेळ व व्यायाम:


सि-60 पथके मुख्यालय येथे रिझर्व असतांना शारिरिक दृष्ट्या सक्षम राहण्याकरीता दररोज सकाळी शारिरिक व्यायाम, कवायत व सांघिक खेळ घेतले जातात. तसेच त्यांना नक्षल विरोध अभियान राबविणे करिता वेळोवेळी नक्षल टॅक्टीस बद्दलची माहिती दिली जाते. तसेच त्यांना नैतिक व मानसिक मनोबल वाढविण्यासाठी मोटिवेशन लेक्चर , कमांडो मुव्हीज दाखविण्यात येते.


प्रशिक्षण:


सि-60 पथकाला अति दुर्गम, संवेदनशिल व पहाडी भागात ऊन, वारा, पाऊस, दिवस व रात्री येणाऱ्या आव्हानांना व समस्येला तोंड देण्यासाठी शरिरिक व मानसिक दृष्टया सक्षम रहण्यासाठी त्यांना उच्च, विशेष व आधुनिक तंत्रद्यानाच्या पध्दतीचे विविध राज्यातील प्रशिक्षण संस्थेमध्ये जवानांना अतिशय खडतर प्रशिक्षणासाठी (ग्रे-हाऊन्स हैदराबाद, एन.एस.जी. मनेसर- हरियाणा - हजारीबाग, कांकेर, यु.ओ.टि.सी. नागपुर) पाठविले जातात.



Telephone number:- 07132222148 ,


Email ID:- c60gadchiroli@mahapolice.gov.in ,